🌹जि.प.उ.प्रा गावंदरा येथे स्वयंशासन दिन उत्साहात संपन्न💐
👉🏻 दिनांक 03/02/2020  जि.प.उ.प्रा.शा गावंदरा येथे विद्यार्थी स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला.
👉🏻 याप्रसंगी संपूर्ण नियोजन शाळेच्या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना करून दिले.त्यानुसार इ.8 वीच्या विद्यार्थ्यांनी आपले नाव नोंदवून आपली भूमिका निश्चित केली.
👉🏻 संपूर्ण शाळेचा कारभार आज विद्यार्थ्यांनी  सांभाळला.पूर्ण तयारी नीशी आपल्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रत्येकाने केला.
 👉🏻 आणि हे करताना त्यांच्या चेहर्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.
👉🏻 कु.आघाव ऋतुजा बळीराम हिने मु.अ ची भूमिका निभावली तर कु.मयुरी लटपटे हिने  उपमुख्याध्यापक , सहशिक्षक/शिक्षीका म्हणून पूजा डिगुळे,संध्याराणी तिडके,विलास बडे,रूपाली घुले,ज्ञानेश्वरी घुले,सुप्रिया घुले,विनायक बडे,शिवनंदा भांगे,पूजा घुलेआणि शिपायाची भूमिका कु.ज्योती घुले हिने निभावली.
👉🏻 विद्यार्थी शिक्षकांचे मूल्यमापन करून त्यांना पारितोषिकही देण्यात आले.
👉🏻 तसेच यावर्षी शाळेतील 3 शिक्षकांचा विद्यार्थ्याच्या वतीने पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.यावर्षी श्री.रामेश्वर मुंडे,श्री.बाबासाहेब चौधरी,श्री.विशाल कदम यांचा सत्कार करण्यात आला.
👉🏻  शेवटी सर्व नवोदीत शिक्षकांचे सर्वांनी कौतुक केले व आभार मानले.
👉🏻 कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.घोळवे सर मार्गदर्शक श्री.सचिन क्षिरसागर, श्री.विजयकुमार सिताप,नवनाथ बडे,ज्ञानोबा बडे,श्रीमती.हळगावकर मॅडम,श्रीमती.घुगे मॅडम, श्रीमती.गुट्टे मॅडम,श्रीमती.श्रीमती.मोतेवार मॅडम,श्रीमती फरताडे मॅडम यांचे सहकार्य लाभले.🙏🙏
📚 शब्दांकन 📚

🖊 श्री.सचिन क्षिरसागर स.शि
जि.प.प्रा.शा गावंदरा ता.धारूर